मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (17:21 IST)

प्रसिद्ध परफ्युम डिझायनर मोनिका घुर्डेचा बलात्कार करून खून

प्रसिद्ध परफ्युम डिझायनर मोनिका घुर्डे (३९) यांचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी फ्लॅटमध्ये हातपाय बांधलेल्या, विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. संशियाताने त्यांच्याकडील दागिने लुटले आहेत. मोनिकावर बलात्कार करून त्यांचा खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.  
 
मोनिका यांची भारतातील सर्वोत्तम परफ्युमर अशी ओळख आहे. अत्तर आणि सेंट निर्मितीची पहिली प्रयोगशाळा त्यांनी चेन्नईत सुरू केली होती. 'स्मेल’वर जगभर वर्कशॉप घेतले होते. अत्तरांच्या आणि सेंटच्या व्यवसायात येण्यापूर्वी त्या फोटोग्राफर होत्या.