बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 3 ऑगस्ट 2010 (07:44 IST)

बाभळी प्रकरणी संयम पाळा- मनमोहन

बाभळी धरणाप्रकरणी महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री तसेच नेत्यांनी संयम पाळावा अशी सूचना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. तेदप नेते चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी प्रकरणी मागील महिन्यात आंदोलन केले होते. यानंतर महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात मोठे वादंग माजले होते.

या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण व आंध्राचे मुख्यमंत्री के रोसैय्या यांनी पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली.