शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 31 मे 2016 (12:21 IST)

बेहिशोबी मालमत्ता खरेदीचा रॉबर्ट वाड्रांवर आरोप

शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रांवर करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली झालेल्या एका शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दलालाकडून वाड्रा यांनी लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली. त्याचा तपास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सुरू केला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता 12, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे.
या तपासात रॉबर्ट वड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज अरोरा यांनी पाठवलेल्या ई-मेलचा संदर्भ देण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा दलाल संजय भंडारी याची कसून चौकशी करण्यात येत आहे. यावर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकार आणि ईडीला पत्र लिहून वाड्रा यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे.