भगतसिंग यांना संबोधले दहशतवादी!
मृदुला मुखर्जी आणि विपीन चंद्रा यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडीपेंडेंस’ नावाच्या या पुस्तकात शहीद भगतसिंग यांना ‘दहशतवादी’ संबोधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली विद्यापीठाने आपल्या पाठ्यपुस्तकात ही चूक केली आहे.
या पुस्तकात चित्तगाव आंदोलन आणि सँडर्स हत्याकांडाला ‘दहशतवादी कृत्य’संबोधण्यात आले आहे. भगतसिंग यांच्यासोबतच चंद्रशेखर आझाद, सूर्य सेना आणि अन्य लोक हे ‘क्रांतिकारी दहशतवादी’ होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर शून्य तासात भाजपचे सदस्य अनुराग ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.