मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतात 57 टक्के डॉक्टरांकडे मेडिकल डिग्री नाही

डॉक्टरला देव मानणार्‍या या देशात लोकं आपले शरीर केवळ विश्वासावर डॉक्टरांच्या हातात सोपवून देतात. ज्या डॉक्टरांना आम्ही देवाच्या जागी मानतो जर त्यांची डिग्री खोटी असेल तर! होय हे खरे आहे की भारतात 57 टक्के डॉक्टरांकडे मेडिकल डिग्रीच नाहीये. हे सर्व्हद्वारे उघडकीस आले नसून स्वत: जागतिक आरोग्य संघटनच्या रिपोर्टहून स्पष्ट झाले आहे.
डब्ल्यूएचओ ने हेल्थ वर्कफोर्स इन इंडिया नावाने एक रिपोर्ट जाहीर केली आहे. यात 2001 साली करण्यात आलेल्या सर्व्हचा ही उल्लेख आहे. या रिपोर्ट्सप्रमाणे, भारतात स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेणारे सुमारे 31 टक्के लोकं केवळ दहावी पास आहे. 57 टक्के लोकं असे आहे, ज्यांच्याकडे कोणतीही मेडिकल डिग्री नाही.
 
मागासलेल्या ग्रामीण क्षेत्रांची स्थिती तर अजून दयनीय आहे. तेथे केवळ 18.8 टक्के लोकांकडेच डिग्री आहे. डब्ल्यूएचओ रिपोर्टप्रमाणे महिला आरोग्य कर्मी पुरुषांच्या तुलनेत अधिक शिकलेल्या आहेत. एलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानी डॉक्टरांना मिळवून राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक एक लाख लोकांवर केवळ 80 डॉक्टर आहेत, संशोधन हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.