बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: भोपाळ , मंगळवार, 7 सप्टेंबर 2010 (11:25 IST)

मध्य प्रदेश सरकार देणार पाच रुपयांत जेवण

मध्य प्रदेश सरकारने गरिबांना पाच रुपयांत जेवण देण्याची एक योजना तयार केली असून, राज्यातील चार मोठ्या शहरांमध्ये येत्या २५ सप्टेंबरपासून, म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपासून ती कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मध्य प्रदेशचे शहरी प्रशासन व विकास मंत्री बाबुलाल गौर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की राम रोटी योजनेंतर्गत भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर व जबलपूर या चार मोठ्या शहरांमध्ये रोज बाराशे गरिबांना केवळ पाच रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये चार किंवा पाच पोळ्या, भाजी व लोणचे देण्यात येईल.