माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शनची दिवाळी भेट
नवी दिल्ली- माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शनची दिवाळी भेट देण्यात येईल, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. बिहार निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, येत्या काही दिवसांमध्ये याबाबतची अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती मनोहर यांनी दिली.
बिहार निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ही अधिसूचना काढता आलेली नाही, मात्र आम्ही त्याकरिता प्रयत्नशील असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले.