रेप तो चलतेही रहेते है: रेणुका चौधरी
नवी दिल्ली- केंद्रातील भाजप सरकार सदस्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने कायम अडचणीत येत असल्याचे दिसत असते. पण आता विरोधी काँग्रेस पक्षाला ज्येष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी अडचणीत आणले आहे. बुलंद शहरमध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक दुष्कङ्र्कासारख्या प्रकरणावर बोलताना रेप तो चलतेही रहते है, अशा शब्दांत त्यांनी या गंभीर विषयाची खिल्ली उडविली.
रेणुका चौधरी यांचे हे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसला उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भोवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दुष्कङ्र्कप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, दुष्कङ्र्क तर होतच असतात. या घटनेच्या 10-12 दिवसांनी त्यांनी कोणाला अटक केली आणि त्याबद्दल त्यांना शाबासकी मिळेल असे वाटत असेल तर असे काहीही होणार नाही. आता पोलीस तपास किंवा अन्य काही असो; त्याला उशीर झाला आहे. आता पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.