बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

संसदेतील गोंधळाने 40 कोटी पाण्यात

महागाईच्या मुद्यावरुन विरोधकांनी एकत्र येत सरकारला मागील आठवड्यात चांगलेच धारेवर धरले. आठवडाभरात एकदाही संसदेचे कामकाज सुरळीतपणे न पार पडल्याने संसदेचे 40 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

आता या पैशांची भरपाई देशातील करदात्यांकडूनच केली जाईल. वाढत्या महागाईवरुन देशातील सर्व विरोधी पक्षांनी संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्‍याची मागणी अध्यक्षा मीरा कुमार यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत आपला विरोध दर्शवण्‍यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून आठवडाभर संसदेचे कामकाज गोंधळामुळे स्थगित करावे लागले आहे.