सलमानचे ‘हिट अँण्ड रन’ आता सुप्रीम कोर्टात
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ‘हिट अँण्ड रन’प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सलमानच्या सुटकेचा निर्णय दिला होता. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे.
सलमानची सुटका करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिका योग्य असून त्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने मंजुरी दिली. मात्र, फास्ट ट्रॅकवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.