1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हैदराबादमध्ये स्फोटाचा कट उधळला

हैदराबाद- राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रात्री हैदराबादमध्ये छापे घालून बाँबस्फोटाचा कट उधळून लावत इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित 13 संशयितांना ताब्यात घेतले. ही माहिती ‘एनआयए’चे पोलीस महासंचालक संजीव कुमार यांनी दिली.
 
जुन्या हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा, चारमिनार, मोगलपुरा, ताबालकट्टा, भवानीनगर, अमाननगर, बहादूरपुरासह 13 ठिकाणी ‘एनआयए’ने छापे घातले. यात ताब्यात घेतलेल्या 13 जणांचा इसिसचे सीरियातील मुख्यालयाशी थेट संपर्क असल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून स्फोटासाठी लागणारी रसायने, चीनी बनावटीची नऊ एम. एम. पिस्तुले, एअर गन व 15 लाख रुपयांची रोख रक्कम, पेन ड्राईव्ह, 25 मोबाइल फोन, लॅपटॉप, सिम कार्ड इसिसशी संबंधित डीव्हीडी व व्हिडिओ क्लिप जप्त केली. जुन्या हैदराबादमधील बंडागुडा येथील निर्मिनुष्य भागात हे दहशतवादी काही दिवसांपासून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत होते. रमजान तसेच गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणावर बॉम्बस्फोट करण्याचा कट त्यांनी रचला होता, असे चौकशीत समजले.