शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मालेगाव प्रकरण: साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला जामीन

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  एप्रिल २०१६ मध्ये एनआयएने साध्वीला क्लीनचीट देत आरोपींवरील ‘मकोका’ हटवला. त्यानंतर साध्वीने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. 
 
मात्र विशोष न्यायालयाने तिच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत, असे म्हणत तिचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. बॉम्बस्फोटात वापरलेली मोटारसायकल आपली असली तरी ती दुसऱ्याला विकण्यात आल्याचा दावा साध्वीने उच्च न्यायालयात केला आहे. साध्वी आजारी असल्याने तिचा जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती साध्वीच्या वकिलांनी न्यायालायाला केली.