रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (18:10 IST)

जैशच्या तळावरील चार इमारती नष्ट

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र या कारवाईत नेमकी किती हानी झाली हे समोर येत नव्हते. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत जैशच्या तळावरील चार इमारती नष्ट झाल्याची माहिती समोर आली होता. भारतीय हवाईदलाच्या एअर स्ट्राइकनंतर घटनास्थळावरून सुमारे 35 दहशतवाद्यांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधून बाहेर आणण्यात आले. असा दावा काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने करण्यात आला आहे. 
 
भारतीय हवाईदलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर काही वेळाने घटनास्थळावरून सुमारे 35 दहशतवाद्यांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधून बाहेर नेण्यात आले. या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यात काम केलेल्यांचाही समावेश आहे, असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.