शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (16:14 IST)

पतंग उडवताना घराच्या छतावरून पडून मुलाचा मृत्यू महूची घटना

death
मकर संक्रातीच्या दरम्यान पंतग उडवतात. पतंग उडवताना अपघात होतात. असाच अपघात होऊन 12 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. इंदूर जिल्ह्यातील महू उपनगरात गुरुवारी संध्याकाळी पतंग उडवताना एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पतंग उडवताना घराच्या छतावरून मुलगा पडला. आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महूमधील लुनियापुरा भागात ही घटना घडली. तनिष्क परदेशी असे मृत मुलाचे नाव आहे. तो छतावरून पडताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परिसरातील लोकांनी सांगितले की, तनिष्क घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्याचा पाय घसरला आणि तो टेरेसवरून बाउंड्री वॉलवर पडला. कोतवाली पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शव  विच्छेदनासाठी पाठवला.   
Edited By - Priya Dixit