रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2024 (16:19 IST)

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

fire
आसामच्या कचार जिल्ह्यात सिलचर येथे एका इमारतीला भीषण आग लागली या इमारतीत एक संगणक संस्था असून या इमारतीत अनेक मुले अडकली आहे. इमारतीवरून पडून एक मुलगी जखमी झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या 3 ते 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग करण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या आगीच्या घटनेच्या व्हिडीओ मध्ये काही मुले इमारतीच्या खिडकीतून खाली उतरताना आणि उद्या मारताना दिसत आहे. शिडीच्या साहाय्याने मुलाना बाहेर काढले जात आहे. इमारतीच्या छतावर अजून ही मुले अडकले आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलीस पथक देखील घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरु केले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

Edited by - Priya Dixit