शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रत्नागिरी , शुक्रवार, 26 मे 2017 (11:55 IST)

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात, ३ ठार

मुंबई - गोवा महामार्गावर सावर्डे आगवे वळणावर अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. पहाटे सव्वा चारच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. चालकाचा आपल्या हातातील वाहनावरील नियंत्रणाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. 

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी विशाल ट्रॅव्हल्स गाडी नंबर एम एच 46 जे 5252 ही गाडी  महामार्गावरील सावर्डे आगवे वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या गाडीत एकूण 47 प्रवासी होते. यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.  जखमींचा आकडा अद्याप समजू शकला नाही. उपचारासाठी जखमींना जवळील डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.