1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 जुलै 2022 (23:36 IST)

Air Arabia: कोची विमानतळावर उतरताना विमान कोसळले, सर्व 222 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स सुरक्षित

संयुक्त अरब अमिरातीच्या शारजहा येथून निघालेल्या एअर अरेबियाच्या (G9-426) विमानाला आज संध्याकाळी कोची विमानतळावर उतरताना तांत्रिक समस्या आली. फ्लाइटच्या हायड्रोलिक सिस्टीममध्ये अडचण आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर कोची विमानतळाला अलर्ट करण्यात आले.
 
विमान सुखरूप उतरले ही दिलासादायक बाब होती. विमानातील सर्व 222 प्रवासी आणि सर्व सात क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
 
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तथापि, आता सर्वकाही सामान्य आहे. विमानतळाचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. इंडिगोहून चेन्नईला पहिले विमान रवाना झाले आहे. रात्री 8.22 वाजता संपूर्ण आणीबाणी मागे घेण्यात आली आहे.
 
दरम्यान, डीजीसीएनेही एक निवेदन जारी केले आहे. DGCA च्या म्हणण्यानुसार, शारजा ते कोची एअर अरेबिया फ्लाइट (G9-426) च्या हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड आढळून आला. विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले आणि इंजिनही बंद झाले. विमान 'बे' मध्ये हलवण्यात आले आहे.