1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (14:01 IST)

हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 ने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून चीन पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. भारतात गतवर्षी प्रदूषणामुळे तब्बल 2 लाख 54 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फक्त चीन आणि भारतातील मृतांचा आकडा जगभरातल्या आकडेवारीच्या अर्ध्याहून जास्त आहे. वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन वायू निर्माण होत असून श्वसनेंदियांचे रोग जडत आहेत. गतवर्षी दिवाळीत दिल्ली आणि एनसीआर परिसरात पसरलेली प्रदूषणाची चादर यामुळे ही समस्या किती जठील झाली आहे याची प्रचिती आली होती. ओझोन वायूमुळे होणा-या मृत्यूंचा आकडा भारतात जास्त आहे. भारताचा हा आकडा बांगलादेशच्या 13  तर पाकिस्तानच्या 21 पट जास्त आहे.