बसेस चालकांपासून ते वाहकांपर्यंत सर्व कर्मचारी कर्नाटक राज्यात संपावर
कर्नाटक राज्यातील चारही परिवहन महामंडळ संघटनांनी संप सुरू केला आहे. या संपात बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बस रोखल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये रस्ते वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे. राज्यातील चारही रस्ते वाहतूक महामंडळांच्या (केएसआरटीसी, बीएमटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी आणि केकेआरटीसी) परिवहन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपामुळे राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या सर्व संघटनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज लोकांना खूप गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
Edited By- Dhanashri Naik