शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (16:33 IST)

राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, छठपूजेबाबत केले होते वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. मुंबईचे स्थानिक निवासी अंखुरी अंजनी कुमार यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. 
 
रांची दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फहीम किरामनी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने राज यांना 18 फेब्रुवारी 2020 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा हाताशी धरत उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. याच पार्श्वभूमीवर 20 जानेवारी 2008 रोजी राज ठाकरे यांनी छठपूजेबाबत वक्तव्य केले होते. “उत्तर भारतीयांचे छठपूजेचे हे नवे नाटक कुठून आले? महाराष्ट्रात राहायचे असेल तर महाराष्ट्राची संस्कृतीसोबतच तुम्हाला राहावे लागेल”, असे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उत्तर भारतीय नेत्यांकडून प्रचंड टीका केली गेली होती.