शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 7 मार्च 2017 (10:47 IST)

केजरीवालांची शुगर वाढली, आता केवळ फलाहार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत  प्रसिद्धीच्या झोतात असतात. राजकारणाव्यतिरिक्त त्यांचा पेहराव, खोकत बोलण्याची शैली किंवा एखाद्याविरुद्ध आरोपांची राळ उडवून देण्याची पद्धत अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. असाच आणखी एक किस्सा केजरीवाल यांच्याबाबत घडला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांचे डायटिंग अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनले आहे. सध्या केजरीवाल यांनी पूर्णपणे अन्नत्याग केला असून ते केवळ सूप, फळ आणि सॅलेडवर राहत आहेत. दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी खुद्द केजरीवाल यांनीच प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या लंचमध्ये केजरीवाल यांनी फक्त सॅलेड खाल्ले. तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी केजरीवालांना याविषयी छेडले असता त्यांना या सगळ्याचा खुलासा केला.
 
गेल्या काही दिवसांत पंजाब आणि गोव्याच्या प्रचाराच्या धामधुमीत केजरीवाल यांनी आहाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्यांच्या रक्तातील शुगरची पातळी मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. ही शुगरची पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या त्यांना सक्तीची पथ्ये पाळावी लागत आहेत. त्यामुळेच सध्या त्यांना फक्त फळे, सॅलेड आणि सूप पिऊन दिवस काढावे लागत आहेत.
 
यापूर्वी ‘क्रोनिक कफ प्रॉब्लेम’ या व्याधीमुळे केजरीवाल यांच्या घशावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर केजरीवालांनी काही काळासाठी राजकारणातून सक्तीची विश्रांती घेतली होती. तत्पूर्वी केजरीवाल यांनी बेंगळुरू येथील जिंदाल नेचर केअर संस्थेत केजरीवाल यांनी नेचरोपथी उपचार घेतले होते. याशिवाय, हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील ध्यानधारणा केंद्रामध्ये दहा दिवसीय विपश्यना शिबिरातही त्यांनी सहभाग घेतला होता.