शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2024 (12:12 IST)

कोच अटेंडंटचा धावत्या ट्रेनमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागपूर RPF कडून अटक

train
देशातील प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि सुरक्षित साधन म्हटले तर ते रेल्वे प्रवास आहे. याद्वारे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहोचू शकतात आणि लोकांना सुरक्षितही वाटते. पण आता या प्रवासी संसाधनाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू-पाटणा पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादीनुसार एका कोच अटेंडंटने चालत्या ट्रेनच्या वॉशरूममध्ये 9 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. बेंगळुरू-पाटणा पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. ही ट्रेन बेंगळुरूहून पाटण्याला जात होती. त्यादरम्यान ही घटना घडली.
 
दरम्यान या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी आरोपी कोच अटेंडंटला बेदम मारहाण केली. मोहम्मद मुन्ना असे आरोपीचे नाव आहे. प्रवाशांनी आरोपीला आरपीएफच्या ताब्यात दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक करून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दुपारी दीडच्या सुमारास ट्रेन बुट्टाबोरी रेल्वे स्थानकाजवळ आली असता एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीने बाथरूममध्ये जाण्यासाठी डब्याचा दरवाजा उघडला. त्यावेळी कोच अटेंडंट मोहम्मद मुन्ना कोचच्या बाहेर बसला होता.
 
पीडितेला एकटी पाहिल्यानंतर त्याने बाथरूममध्ये जाऊन दरवाजा ढकलून बाथरूममध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेने पीडित मुलगी घाबरली. याचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. यामुळे ती आणखीनच आरडाओरडा करू लागली. पीडित मुलीने कसातरी दरवाजा उघडला आणि आवाज करत बाहेर पळत सुटली.
 
दुसरीकडे मुलीच्या किंकाळ्या ऐकून डब्यातून प्रवास करणारे प्रवासी जागे झाले. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी आरोपी मोहम्मद मुन्नाला बेदम मारहाण केली. घटनेनंतर काही वेळातच गाडी नागपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली. तेथे प्रवाशांनी आरोपीला आरपीएफच्या ताब्यात दिले. आरोपी मुन्नाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.