मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 जून 2023 (16:51 IST)

बहराइच : वधू वराचे एकत्र हार्ट अटॅक ने मृत्यू

उत्तरप्रदेशातील बहराइच मध्ये लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू वर दोघेही बेडवर मृतावस्थेत आढळले. या नंतर घरात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. अहवालानंतर जे समोर आले ते धक्कादायक होते. 
 
अहवालानुसार वधू आणि वर यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानं झाला. शव विच्छेदनानंतर नवविवाहित जोडप्याचं एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
मिळालेल्या माहितीनुसार, बहराइच जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोधिया नंबर चार गावातील प्रताप यादव यांचे लग्न 30 मे रोजी पुष्पा हिच्याशी मंगल मेळा गावात झाले.आनंदित वातावरणात 31 मे रोजी प्रताप यांनी नववधू पुष्पाला आपल्या घरी वाजत गाजत आणले. घरात आनंदित वातावरण होते. रात्री ते दोघे झोपायला खोलीत गेले. नंतर दुसऱ्या दिवशी ते दोघे खोलीत बेडवर मृतावस्थेत आढळले. या नंतर घरात एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले. अहवालात दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचे निष्पन्न झाले. 
ज्या घरात वरात आली होती.त्या घरातून नाव दांपत्याचे मृतदेह नेण्यात आले.पाणवलेल्या डोळ्यांनी प्रताप आणि पुष्पा या नवदांपत्यावर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.  
 
Edited by - Priya Dixit