मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (14:53 IST)

उद्यापासून 4 दिवस बँका बंद राहतील, आज सर्व काम करून घ्या

बँक ग्राहकांसाठी ही महत्वाची माहिती आहे की उद्या शनिवारपासून बँका 4 दिवस बंद राहतील. जर बँकेशी संबंधित कोणतेही व्यवहार करायचे असेल तर ते आजच पूर्ण करणे चांगले, कारण 28 ते 31 ऑगस्ट पर्यंत अनेक शहरांच्या बँकांमध्ये कोणते ही काम होणार नाही.खरं तर, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान बँका बंद राहतील. तथापि,या काळात ऑनलाइन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहतील.
 
आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. RBI ने या आठवड्यात बँकांसाठी 4 दिवसांची सुट्टी निश्चित केली आहे. मात्र, या सुट्ट्या प्रत्येक राज्यातील बँकांना लागू नाहीत. 28 ऑगस्ट या महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल. 29 ऑगस्ट हा रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. 30 ऑगस्टला अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. जन्माष्टमी / श्री कृष्ण जयंती 30 ऑगस्ट, 2021 रोजी आहे.
 
या दिवशी अनेक शहरांच्या बँका बंद राहतील:  28 ऑगस्ट 2021 - 4 था शनिवार,  29 ऑगस्ट 2021 रविवार,  30 ऑगस्ट 2021 - जन्माष्टमी / श्री कृष्ण जयंती (अहमदाबाद,चंदीगड,चेन्नई, देहरादून,जयपूर,जम्मू ,कानपूर, लखनौ,पटणा,रायपूर,रांची,शिलाँग,शिमला,श्रीनगर आणि गंगटोक), 31 ऑगस्ट 2021 - श्री कृष्ण जन्माष्टमी (हैदराबाद).