सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (11:02 IST)

भिवानीमध्ये मोठा अपघात: ट्रॅक्टरला धडकून हांसीकडे जाणारी बस उलटली, चार ठार

हरियाणातील भिवानी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टर-टॅली आणि बस यांच्यात जोरदार धडक झाली. यानंतर खाजगी बस उलटली.या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले.आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.ही बस भिवानीहून हांसीकडे जात होती.
 
भिवानीहून हरियाणातील हांसीकडे जाणारी खासगी बस गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जटू लुहारी गावाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकली.या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून अनेक जण जखमी झाले आहेत.जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.त्यांना हायर सेंटर कडे पाठवण्यात आले आहे, तेथून काहींना रोहतक पीजीआयमध्ये तर काहींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
सायंकाळी सातच्या सुमारास एक खासगी बस भिवानीहून हांसीसाठी निघाली. बस प्रवाशांनी भरलेली होती. सांगितले जात आहे की जटू लुहारी गावात पीरच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर बसचा टायर फुटला.बस भरधाव वेगात असल्यामुळे बसचा तोल गेला.वळणावर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला बसने धडक दिली.यानंतर बस उलटली.घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठून परिस्थितीचा आढावा घेतला.
 
उलटल्यानंतर बसच्या खिडक्या खाली वाकल्या.यामुळे जखमींना बसमधून काढता आले नाही. लोकांनी लगेच जेसीबी बोलावून बसचे छत उपटून काढले.यानंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले.