गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (13:21 IST)

रिसेप्शनपूर्वी नवर्‍याने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली, स्वत:ही मृत्यूला कवटाळलं

आजकाल लग्नासारख्या पवित्र बंधनात विश्वास आणि स्थिरता नसल्याचे चित्र दिसून येत आहे. क्षुल्लक गोष्टींवर नाती तुटत आहेत. असेच एक नवीन प्रकरण छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून समोर येत आहे.  टिकरापारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवर्‍याचे काही कारणावरून बायकोसोबत वाद झाला. यानंतर त्याने पत्नीचा चाकूने वार करून खून केला आणि स्वत:वर वार करून मृत्यूला कवटाळले.
 
या जोडप्याचे 19 तारखेला लग्न झाले होते आणि 21 फेब्रुवारी रोजी रिसेप्शन होते, त्यासाठी तरुण तयार होण्यासाठी रूमवर गेला होता. तेथे काही कारणावरून त्याचे पत्नीशी भांडण झाले, त्यानंतर तरुणाने आधी पत्नीवर चाकूने वार केले आणि नंतर स्वतःवर वार केले. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथं दोघांचा मृत्यू झाला. 
 
अस्लम बसीर अहमद असे मृत तरुणाचे नाव असून तो संतोषी नगर येथील रहिवासी आहे. कहकशा बानो असे मृत तरुणीचे नाव असून ती राजा तालाब येथील रहिवासी आहे. सध्या पोलिसांनी चाकू ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 
दोन दिवसांपूर्वी लग्न झाले
दोघांचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. अशा स्थितीत वृत्त लिहिपर्यंत खुनाचे कारण समजू शकले नाही. कुटुंबीयांकडून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. टिकरापारा पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. तरुण आणि तरुणी एकमेकांना आधीच ओळखत होते. लग्नाचे रिसेप्शन होण्यापूर्वी काही वादातून पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्याही केली. मात्र दोघांनी हे पाऊल नेमकं का उचललं याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.