सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (13:37 IST)

भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

Bhagwant Mann takes oath of office and secrecy as Chief Minister of Punjab भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून घेतली पद आणि गोपनीयतेची शपथMarathi National News In Webdunia Marathi
भगवंत मान यांनी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकेकाळी विनोदी कलाकार असलेले भगवंत मान आजपासून पंजाबची कमान सांभाळत आहेत. आपल्या शपथेला  ते म्हणाले की, त्यांच्यासोबत तीन कोटी पंजाबीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या गावात आम आदमी पार्टीने शपथविधी सोहळा आयोजित केला आहे. सर्वसामान्यांचे सरकार स्थापनेचे संकेत देत पक्षाने राजभवनाऐवजी भगतसिंगांच्या गावात शपथविधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 
शपथेपूर्वी भगवंत मान म्हणाले की, आम्ही भगतसिंग आणि भीमराव आंबेडकर यांची स्वप्ने पूर्ण करण्याची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.