गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (23:34 IST)

मोदी मंत्रिमंडळाची उद्या बैठक, होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकते मोठी भेट

मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक दुपारी एक वाजता संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. मंत्रिमंडळाची ही बैठक कोणत्या अजेंड्यावर होणार, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी मंथन सुरू असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक होणार आहे. 
 
बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 च्या होळीच्या पूर्वी मोठी बातमी मिळू शकते. देशभरातील लाखो कर्मचारी वाढीव डीएच्या प्रतीक्षेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सरकार दरवर्षी मार्चमध्ये महागाई भत्ता जाहीर करते. यावेळी 16 तारखेला होणाऱ्या या बैठकीत सरकार डीएबाबत निर्णय घेऊ शकते, अशी अपेक्षा आहे.
 
कर्मचार्‍यांचा डीए जानेवारी 2022 पासून वाढवला जाणार होता, मात्र सरकार आता डीए वाढवण्याची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाईल. होळीनंतर कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे सर्व पैसे मिळतील.