भय्यूजी महाराज पंचतत्वात विलीन
आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमधील मेघदूत मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भय्यू महाराजांची मुलगी कुहू हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. बुधवारी सकाळी भय्यूजी महाराजांचे पार्थिव त्यांच्या इंदूरमधील सर्वोदय आश्रमात सकाळी दहा ते दीड वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. महाराजांच्या हजारो अनुयायांनी त्यांचे दर्शन घेतले.
अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अंत्ययात्रेला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या अनुयायांना चांगलाच धक्का बसला आहे. उल्लेखनीय आहे की भय्यूजी महाराज यांनी तणावामुळे स्वत:वर गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.