रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (10:02 IST)

मोठी बातमी !जम्मू विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात मोठा स्फोट

जम्मू विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्यामुळे गोंधळ उडाला.स्फोटानंतर बॉम्ब विरोधक दल आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले.
 
वृत्तसंस्था एएनआयने ट्विट केले की, आज जम्मू विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात  स्फोटाचा आवाज ऐकू आला. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की रात्री सवा दोन च्या सुमारास हा स्फोट झाला.पहिल्या स्फोटामुळे इमारतीची छत कोसळली आणि दुसरा स्फोट जमिनीवर झाला.
 
कुठल्याही जीवित हानीची अद्याप माहिती नाही.ते म्हणाले की सुरक्षा दलाने काही मिनिटांतच हा परिसर सील केला. वरिष्ठ अधिकारी, पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.