गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 जून 2023 (16:35 IST)

Bihar : वृद्धाच्या अंगावरून मालगाडी निघून गेली, वृद्ध आरामात उठून चालू लागला

social media
दैव तारी त्याला कोण मारी, असे काहीसे घडले आहे बिहारच्या गया येथे, बिहारच्या गयामध्ये मालगाडीच्या 10 वॅगन एका वृद्धाच्या अंगावरून गेल्या, मात्र काहीही झालं नाही . यानंतर, 75 वर्षीय व्यक्तीने आरामात आपली काठी चलली आणि तेथून चालायला सुरुवात केली. आता या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना गयाच्या पहारपूर रेल्वे स्थानकाची आहे. 
 
गया-कोडरमा रेल्वे मार्गावरील पहारपूर रेल्वे स्थानकाच्या डाऊन लाईनवर एक मालगाडी जवळपास 1-2 तास सिग्नलची वाट पाहत उभी होती.एका म्हाताऱ्याला पलीकडे जायचे होते. वृद्ध मालगाडीच्या डब्या खालून दुसऱ्या बाजूला जात असताना अचानक सिग्नल हिरवा झाला, त्यामुळे ट्रेन सुरु झाली .  
 
मालगाडीच्या खाली प्रसंगावधान राखून त्या वृद्धाने आपली काठी रुळावर टाकली 
मालगाडीखाली वृद्धाला पाहून स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांची गर्दी तेथे पोहोचली आणि त्याला पाहून सर्वजण थक्क झाले. 
 
आता या वुद्ध व्यक्तीचे मरण आले असे सगळ्यांना वाटले. तिथे असलेल्या लोकांनी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. मालगाडी त्याच्या अंगावरून धावत होती. सदर व्यक्ती शांतपणे रुळाच्या मध्यभागी पडून होते. मालगाडीचे 10 डबे पुढे गेले. मालगाडी निघून गेल्यावर वडिलधारी मंडळी स्वतःच आपल्या काठ्या घेऊन उभ्या राहिल्या आणि आरामात रेल्वे रुळ ओलांडत चालू लागले.

Edited by - Priya Dixit