गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मे 2018 (14:59 IST)

पालघर मध्ये भाजपा विजयी, शिवसेनेला धक्का

भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित पालघर लोकसभा पोटनिडवणुकीत  विजयी झाले आहेत. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला आहे. 

भाजपच्या राजेंद्र गावित यांनी मतमोजणीत सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. दुपारी एक पर्यंत राजेंद्र गावित यांना 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मिळाली. तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे 2 लाख 9 हजार मतांसह दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. मतमोजणीच्या अजून काही  फेऱ्या शिल्लक आहेत. मात्र गावित हे जवळपास 28 हजार मतांनी आघाडीवर असल्याने, त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे.  दुपारी 12 पर्यंत झालेल्या 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी जवळपास 20 हजारांची आघाडी मिळवली. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही सुरुवातीला तिसऱ्या स्थानावर होते, नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. शिवसेना-भाजपने पालघरमध्ये समोरा समोर ही निवडणूक झाली आहे. पाभाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार विरोधात  होते.