सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 30 मे 2018 (15:42 IST)

एन डी ए चा दीक्षांत सोहळा, कॅप्टन अक्षत राज प्रेसिडेन्ट्स गोल्ड मेडल

पुणे येथील खडकवासलामधील खेत्रपाल ग्राऊंडवर नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात एनडीएच्या 134 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आपार पडला आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कोर्समध्ये बटालियन कॅडेट कॅप्टन अक्षत राज हा सुवर्ण पदकाचा (प्रेसिडेन्ट्स गोल्ड मेडल) मानकरी ठरला आहे. सोबत त्याचा सहकारी कॅडेट कॅप्टन मोहम्मद सोहेल अस्लमला रौप्य पदकाने (प्रेसिडेन्ट्स सिल्व्हर मेडल) गौरवण्यात आले आहे. स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन अली अहमद चौधरीला कांस्य पदक (प्रेसिडेंटस ब्राँझ मेडल) देवून गौरव करण्यात आले आहे. या सर्वांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला आहे. अक्षत राज हा मूळचा बिहारचा आहे. मोहम्मद सोहेल अस्लम पश्चिम बंगाल तर अली अहमद चौधरी आसामचा आहे.
 

राष्ट्रपतींनी कॅडेट्सना संबोधित केलं. संरक्षण सेवेमुळे देशाचं ऐक्य कायम आहे असं राष्ट्रपती म्हणाले. तसंच एनडीएचं ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीदवाक्य कायम स्मरणात ठेवण्याचं आवाहनही त्यांनी कॅडेट्सना केले आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थी आता देश सेवेत रुजू होणार आहेत.