गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 30 मे 2018 (09:39 IST)

नाणेफेक यापुढेही कायम राहणार

याआधी आता कसोटीमधून नाणेफेक रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली होती. पण नाणेफेक ही कसोटी क्रिकेटचा अविभाज्य घटक असल्यामुळे ती यापुढेही कायम राहणार आहे. परदेशी संघांच्या पारडय़ात नाणेफेक जिंकल्याचा निर्णय थेट टाकण्यात येणार नाही. भारताचा  माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या चेअरमनपदाखाली गेले दोन दिवस मुंबईत पार पडलेल्या आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत महत्त्वाच्या बाबींवर सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या गैरवर्तणुकीला थारा असणार नाही. यापुढे शिवीगाळ, बॉल टॅम्परिंग, मॅचफिक्सिंग यांसारख्या गोष्टींमध्ये दोषी सापडलेल्या क्रिकेटपटूंना कठोर कारवाईचा सामना करावा लागणार आहे.