गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2024 (11:34 IST)

2 लहान मुलांचा गळा चिरून निर्घृण खून, आरोपीला पोलिसांनी एन्काउंटर करून ठार मारले

murder
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एक-दोन निष्पाप मुलांची गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या हत्याकांडातील आरोपीला चकमकीत ठार केले. दोन मुलांच्या हत्येनंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी जाळपोळ आणि तोडफोडही केली.बदायूं येथील मंडई समिती पोलीस चौकीपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या बाबा कॉलनीत मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता कंत्राटदार विनोद ठाकूर यांची दोन मुले आयुष (13) आणि आहान (6) यांची कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केली.त्यांच्या घरासमोर सलूनचालवणाऱ्या तरुणाने हे खून केले असून घटनेच्या तीन तासानंतर पोलिसांनी आरोपीचे एन्काउंटर करून ठार मारले. साजिद असे या आरोपीचे नाव होते. 

बदायूं मधल्या या हत्याकांडाने सम्पूर्ण शहर हादरलं आहे. साजिद आणि जावेद यांचे सलून विनोद यांच्या घराच्या समोर असून त्यांच्यात घरासारखे संबंध होते. आजारी बायकोसाठी पाच हजार रुपये पाहिजे अशी मागणी केली  नंतर विनोदची पत्नी त्यांच्यासाठी घरात चहा करायला गेली असता, आरोपी साजिद ने टेरेसवर जाऊन विनोद यांच्या दोन चिमुकल्यांचा गळा चिरून खून केला. विनोदचा मधला मुलगा हा आरोपीला पाणी देण्यासाठी गेला असता त्याने त्याच्यावर देखील वार केला तो ओरडत खाली आला. साजिद रक्ताने माखला होता. रस्त्यावरील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो लोकांना ढकलून पळून गेला. विनोद हा कंत्राटदार असून त्याची पत्नी संगीता ही घरातच कॉस्मेटिक्स विकण्याचं काम करते. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस साजिद आणि जावेदच्या शोध घेऊ लागले. 
 
पोलिसांना साजिद जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी नाकाबंदी केली. साजिदने पोलिसांवर गोळीबार केला. या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. प्रत्युत्तर पोलिसांनी देखील गोळीबार केला त्यात साजिद ठार झाला आहे. जावेदच्या शोध अद्याप सुरु आहे.हत्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.   
 
Edited by - Priya Dixit