खरगोनमध्ये पुलावरून बस पडली, 20 जणांचा मृत्यू
मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी बसचा अपघात झाला असून त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खरगोनमध्ये बस नदीत पडल्याने बसमधील अनेकांचा मृत्यू झाला. खरगोन ठिकरी मार्गावर हा अपघात झाला. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच 20 हून अधिक मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर ते पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सध्या गावकऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमींना मदत करण्यात गुंतले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी जोशी हेही घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृतांमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनरचा समावेश आहे. बस ओव्हरलोड असल्याचे सांगण्यात येत आहे. एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना वाचवण्यात येत आहे. यासाठी पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खरगोन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Edited by : Smita Joshi