एनडीटीवीचे प्रणव रॉय यांच्यावर सीबीआयचे छापे
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या दिल्ली आणि देहराडून येथील घरांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी छापे टाकले. एका खासगी बॅंकेचे पैसे थकविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव रॉय, त्यांची पत्नी राधिका रॉय आणि आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आयसीआयसीआय बॅंकेचे 48 कोटी थकविल्याप्रकरणी प्रणव रॉय यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दिल्ली, देहराडूनसह चार ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली.