बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2019 (12:12 IST)

गुजरात काँग्रेसची वेबसाइट हॅक, हार्दिकचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये सामील झाल्याच्या काही दिवसानंतरच अज्ञा‍त लोकांनी गुजरात काँग्रेसची आधिकारिक वेबसाइट हॅक केली आणि त्याचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केले आहे.
 
हे फोटो 2017 निवडणुकीच्या आधी आलेल्या कथित सेक्स व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट दिसत आहे. फोटोत पटेलसारखा दिसणार्‍या व्यक्तीला बिछान्यावर एक मुलीसोबत बसलेलं दर्शवण्यात आले आहे आणि खाली लिहिले आहे की - 'आमच्या नवीन नेत्याचे स्वागत.'
 
प्रदेश काँग्रेस प्रवक्ता मनीष दोशी यांच्याप्रमाणे पार्टीच्या आयटी टीमला याबद्दल माहिती मिळाल्यावर लगेच वेबसाइट बंद करण्यात आली. लवकरच ऑनलाइन करण्यात येईल. 
 
ज्यांना हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये सामील झालेला आवडला नाही त्यांनी हे काम केले असावे याची शक्यता दर्शवली जात आहे.