रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (08:15 IST)

'या' शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळले

दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी याचे आदेश दिले आहेत. बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना निवडणुकांचे काम देऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुकांच्या कामातून वगळले जावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
 
यासाठी शिक्षक संघटनांनी प्रयत्न केले होते. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने याप्रकरणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, शिक्षण सचिव व बोर्डाला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जून पूर्वी बोर्डाचे निकाल लावण्यासाठी दहावी व बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी केली होती.