शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडला का ?

मार्च महिन्यात दूरसंचार मंत्रालयानं टेलिकॉम कंपन्यांना सर्व यूजर्सला आधारकार्डच्या सहाय्याने पुन्हा व्हेरिफाय करण्याचे आदेश दिला होता. त्यानंतर एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांनी यूजर्सला मेसेज पाठवणंही सुरु केलं आहे. ‘आपला नंबर चालू ठेवण्यासाठी आधारकार्डशी लिंक करा.’ असे मेसेज कंपनीकडून पाठवण्यात येत आहेत. जे नंबर व्हेरिफाय होणार नाहीत किंवा आधारशी लिंक होणार नाहीत ते नंबर 6 फेब्रुवारी 2018 पासून भारतात अवैध मानले जातील.
कसे कराल मोबाइल नंबर आधारकार्डशी  लिंक 
 
१.मेसेज मिळताच ऑपरेट स्टोरमध्ये जा.
 
२. सोबत आधार कार्ड घेऊन जा. आणि त्यातील माहिती स्टोरला द्या.
 
३. त्यानंतर तुमच्याकडे व्हेरिफिकेशन येईल. 
 
४. व्हेरिफिकेशन नंबर कन्फर्म केल्यानंतर तुमचं फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन होईल. 
 
५. 24 तासात तुमचा नंबर आधारकार्डशी लिंक होईल.