अजमेरमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर 70 किलोचे 2 सिमेंट ब्लॉक ठेवले
अजमेरमध्ये सरधना आणि बांगर ग्राम रेल्वे स्थानकादरम्यान दोन ठिकाणी 70 किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक्स अज्ञात लोकांनी ठेवले. सुदैवाने त्यांना तोडत ट्रेन पुढे गेली आणि कोणताही अपघात झाला नाही. फुलेरा ते अहमदाबाद मार्गावर रविवारी रात्री ही घटना घडली आहे. ही मालगाडी फुलेराहून अहमदाबादला जात होती. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरधना बांगर स्थानकावर अज्ञातांकडून 70 किलो वजनाचा सिमेंटचा ब्लॉक रुळावर ठेवून रेल्वे रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, रेल्वेचे इंजिन हा ब्लॉक तोडून पुढे गेले, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. DFCC चे रवी बुंदेला आणि विश्वजित दास यांनी जवळच्या मांगलियावास पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे.
त्यांनी सांगितले की, रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यात आला होता आणि जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ब्लॉक तुटलेला आणि जवळच पडलेला दिसला. पुढे गेल्यावर आणखी एक ब्लॉक तुटलेला आढळून आला. ट्रॅकवर सापडलेले दोन्ही ब्लॉक वेगवेगळ्या ट्रॅकवर होते.