मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

फ्लिपकार्टच्या ऑफिसमध्ये 15 लाखाची लूट

हाजीपुर- बिहारच्या वैशाली जिल्ह्यात नगर थाना भागात अंजानपीर चौक स्थित ऑनलाइन कारोबार करणारी कंपनी फ्लिपकार्टच्या कार्यालयातून रात्री बदमाश 15 लाख रुपये फस्त करुन गेले. पोलिसांनी या बाबद एफआयआर दाखल केली.
 
पोलिस सूत्रांप्रमाणे रात्री बाइक्सवर आलेल्या सहा-सात बदमाशांनी फ्लिपकार्टच्या ऑफिसमध्ये शिरुन तेथील कर्मचार्‍यांना हत्यारांची भीति दाखवत काउंटरवर ठेवलेले 15 लाख रुपए लुटून चंपत झाले.
 
सूत्रांप्रमाणे कर्मचार्‍यांकडून सूचना मिळत्या क्षणी घटनास्थळी पोहचून पोलिसांनी तपास सुरु केला. ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज देखील बघितले जात आहे.

फोटो: सां‍केतिक