रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (17:21 IST)

दिल्लीत सबसिडीमुळे कमी दर

दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात महावितरणचे वीजदर वाजवीच असून दिल्ली येथील नियामक आयोगाने घरगुती ग्राहकांना 0 ते 200 युनिटपर्यन्त प्रतियुनिट 4 रुपये तर 201 ते 400 युनिटपर्यन्त प्रतियुनिट 5 रुपये 95 पैसे असा वीजदर निश्चित केला असतानाही दिल्ली सरकारने वीजदरात मोठ्याप्रमाणात सबसिडी दिल्यामुळे घरगुती ग्राहकांनी भरावयाचे वीजदर कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत हे म्हणणे संयुक्तिक नाही. तसेच महावितरणने वीजदेयकात स्वतंत्रपणे लावलेल्या वहन आकारामुळे वीजदरात कुठलीही वाढ झालेली नाही, असे महावितरणने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
 
महावितरणच्या तुलनेत दिल्लीमधील वीजदर कमी आहेत, अशा प्रध्दतीचा अपप्रचार विविध माध्यमांतून केला जात आहे.  परंतु दिल्लीमध्ये तेथील शासनाने 200 युनिटपर्यन्त प्रतियुक्त 2 रुपये तर 201 ते 400 युनिटच्या वापरापर्यन्त प्रतियुनिट 2 रुपये 97 पैसे अशी सबसिडी ग्राहकांना दिली आहे.  परिणामी दिल्लीतील घरगुती ग्राहकांनी भरावयाचे वीजदर हे कमी झाले आहेत.
 
वीजदर निश्चित करण्याचेे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांना असून महावितरणला यात बदल करण्याचे कुठलेही अधिकार नाहीत.  दि. 26 जून 2015 च्या आदेशापर्यन्त वीजबिलात स्थिर आकार आणि अस्थिर आकार असे दोन भाग होते.  वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्या अस्थिर आकाराचे भाग आहेत. परंतु आयोगाच्या दि. 3 नोव्हेंबर 2016 च्या आदेशानुसार आता वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार व वहन आकाराचा समावेश करण्यात आला आहे.  त्यामुळे वहन आकार हा नवीन आकार नसून वीजबिलाचाच भाग आहे. म्हणून वहन आकार लागू केल्याने वीजदरात वाढ झालेली नाही.