शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अशी होती अय्याशी बाबाची गुहा

बाबा गुरमीत  राम रहीम  ज्या ठिकाणी राहत होता त्याला बाबाजी की गुफा अर्थात बाबाची गुहा असे म्हणत असत. हि गुहा त्याने स्वतः बनवली होती. रोज त्या गुहेतील बेड आणि इतर गोष्टी बदलल्या जात होत्या. ही गुहा म्हणजे महल आहे. सध्या बाबा राम रहीम बाबत्त अनेक किस्से समोर येथे आहे.

यात सर्वात महत्वाचा आहे ती म्हणजे बाबाची गुहा. ही गुहा म्हणजे बाबाचे घर आणि त्याच्या अय्याशीचे केंद्र होते. येथेच त्याने अनेक महिलांना त्रास दिला त्यांचे लैगिक शोषण आणि बलात्कार केले आहेत.या गुहेत याने "हराम" तयार करवून घेतला होता. शाळेत शिकणाऱ्या आणि इतर मुली अश्या २०० मुली येथे ठेवल्या होत्या.  यामधील ३० मुली कोणत्या न कोणत्या प्रकारे बाबाची सेवा करत असत. या भागात पुरुषांना येण्यास पूर्णपणे बंदी होती.

ही गुहा पांढऱ्या रंगाने रंगवली  होती.  यामध्ये त्यांनी उंची अश्या लाकडपासून फार्निस्चार तयार केले होते.बाबाचा ड्रायव्हर राहिलेला आणि साध्वी बलात्कार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार खट्टासिंहने सांगितल्यानुसार बाबा रोज एक मुलगी बोलवत असे आणि अत्याचार करत असे. या ठिकाणी त्याची एकट्याची गाडी आत जात असे . तर त्याची रोजची महिला संत्री बाबाला या ठिकाणी मुली आणून देत असे.
 
प्रकरणातील प्रमुख साक्षीदार खट्टासिंहने त्याने पुढे सांगितले की  सांगितले, की बाबाच्या गुहेत रोज एक नवी मुलगी येत होती किंबहुना तिला बळजबरी धमकी देवून आणले जात होते. यामध्ये डेरा आश्रमातील  त्याच्या गुहेचा दरवाजा गर्ल्स स्कूलच्या कॅम्पसमध्ये उघडत होता. तो एका मुलीची निवड करायचा आणि मग ती त्या गुहेत आणली जात होती. ही जी  बाबाची गुहा ही आश्रमातील प्रिटिंग प्रेसच्या बाजूला होती. तिथे एक मोठा हॉल आणि स्विमिंग पुलही होता.
 
तर मुलींचे रात्री आवाज येत
 
तर एका  डेरा समर्थकाने सांगितले, की त्याची ड्यूटी कधी-कधी प्रिटिंग प्रेसजवळ लागत होती. तो तेथे रात्रभर थांबत असे तेव्हा फार भीती वाटत असे. जेव्हा हा बाबा रामरहीम  मुलींसोबत जनावराप्रमाणे व्यवहार करत होता. त्याच्या या जागेतून मध्यरात्रीनंतर मुलींच्या किंचाळण्याचे आवाज येत होते. तर हा बाबा  त्यानंतर गुरमीत गुहेच्या वरच्या बाजूला असलेल्या भागातील खिडकी उघडत होता. तेव्हा सर्व ऐकू येत असे. याच भागात त्याने शिश महाल तयार केला आहे. यामध्ये तो मुलीना नाचायला सागत असे आणि त्यांची मजा बघत असे.
 
गुहेत बलात्काराचा होता कोडवर्ड :
 
हो ह्या अय्याश बाबाने त्याच्या या कामासाठी एक कोडवर्ड तयार केला होता. बाबा राम रहिमच्या गुहेत बलात्कारासाठी ज्या महिला आणि युवतींसोबत अश्लील चाळे करायचा त्याला तो त्यांची  “माफी” म्हणत असे. म्हणजे जेव्हा एखादी युवती किंवा महिला राम रहिमच्या गुहेत पाठवली जात होती, तेव्हा त्याचे चेले त्याला 'बाबाची माफी' मिळालेली महिला म्हणायचे. तो अश्या प्रकारे अत्याचार करत असे.
 
गुहेत येताना बायोमेट्रिक
 
या बाबाने त्याला भावतील अश्या सर्व २०० मुलींचे बायोमेट्रिक केले होते. जेव्हा या मुली आत येत तेव्हा बायोमेट्रिक पद्धतीने आत प्रवेश करत मात्र बाहेर येताना बाबा ठरवत असे की कोण कधी बाहेर जाणार आहे. तर त्याने त्याच्या जवळच्या  सर्व पुरषांची नसबंदी केली होती.