रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला

गुरमित राम रहीम सिंगचा खरा चेहरा जगासमोर आणून सीबीआयकडे तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्या महिलेने न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला  न्याय मिळाला, मी गुरमित राम रहिमला घाबरत नाही’ असे पीडित महिलेने म्हटले आहे.
 
न्यायालयातील सुनावणीचा प्रसंग सांगताना ती म्हणाली, ‘२००९ मध्ये न्यायालयात सुनावणीसाठी गेले होते. माझी साक्ष घेतली जात असताना डेरा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डेरा समर्थक शस्त्र घेऊनच न्यायालयात यायचे. पण तेव्हा आणि आत्तादेखील मी गुरमित राम रहीमला घाबरत नाही’ असे पीडितेने सांगितले आहे.