मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (11:47 IST)

कोरोनाकाळात नवे संकट,झिका विषाणूचा रुग्ण 'या' 'राज्यात' आढळला

कोरोनाविषाणूचे प्रादुर्भाव जरी कमी झाले आहे,तरीही कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नाही.अशा परिस्थितीत कोरोनाचे विषाणू आपले नवीन नवीन रूप बदलत असतानाच आखणी एका नवीन विषाणूने आपले तोंड वर काढले आहे.या नवीन विषाणूचे नाव आहे झिका.हा आजार डासाच्या चावल्याने होतो आणि या विषाणूची लागण केरळ मधील एका 24 वर्षीय गर्भवती महिलेला लागली आहे.ही माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.
 
तिरुअनंतपुरम मध्ये देखील झिका विषाणू चे आणखी 13 संशयित रुग्ण असल्याची माहिती देखील मिळाली आहे.या सर्व रुग्णांचे नमुने चाचणी साठी पुण्यातील 'नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्ह्यायरोलॉजी ला पाठविण्यात आले आहे.या चाचणीचे परिणाम आल्यावरच संक्रमणाची पुष्टी केली असल्याची  माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार या संक्रमित महिलेने गेल्या 7 जुलै रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला या बाळामध्ये देखील या विषाणूंचे संक्रमण आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.
 
या संक्रमित महिलेला 28 जून रोजी ताप,डोकं दुखी,अंगावर लाल डाग असे काही लक्षणे आढळून आले होते.त्यांनतर या महिलेला रुग्णालयात दाखल केले.नंतर त्या महिलेची चाचणी साठी नमुने पुण्याच्या 'नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्ह्यायरोलॉजी ला पाठविण्यात आल्यावर तिच्या अहवालात झिका विषाणू आढळला असून या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
 
या व्हायरसची लक्षणे म्हणजे किरकोळ ताप येणे,सांधेदुखी,अंगदुखी होणे,अशी आहे.तज्ज्ञ या प्रकाराला गुलियन बार सिंड्रोम असे ही म्हणतात तज्ञाच्या मतानुसार या आजारामुळे लकवा देखील होऊ शकतो.या झिका विषाणूसाठी अद्याप कोणतेही उपचार नाही.तर याची लागण लागल्यामुळे झिका व्हायरस बाधित रुग्णांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.तसेच रुग्णांनी भरपूर विश्रांती घ्यावी. 
 
हा आजार नर्व्हस सिस्टमचा कमी प्रमाणात होणारा आजार आहे.या विषाणूमुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाला देखील याची लागण लागू शकते.तसेच काही बाळांच्या मेंदूत हा विषाणू आढळला आहे. 
 
या विषाणू मुळे बळी पडलेल्या रुग्णांची मृत्यू दर खूपच कमी आहे. या आजारात पाच पैकी केवळ एकच रुग्णाचा मृत्यू होतो.या आजाराला अद्याप कोणताही उपचार नाही.