बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (16:18 IST)

अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा छापा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. ईडीकडून बायोटेक संधेसारा घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांची चौकशी सुरु आहे. स्टर्लिंग बायोटेक घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांच्यावर 15 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. 
 
स्टर्लिंग  बायोटेक लिमिटेड (एसबीएल)/सांदेसरा ग्रुपच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी ईडीने अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अहमद पटेल यांनी कोरोनाची परिस्थिती आणि 65 वर्षांवरील वय हे कारण सांगत चौकशीला जाणं टाळलं होतं. यानंतर आता ईडीकडून थेट त्यांच्या घरावरच छापा टाकण्यात आला आहे. यानंतर ईडीकडून अहमद पटेल यांचीही चौकशी केली जात आहे.
 
ईडीच्या छाप्यानंतर अहमद पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संदेसरा समुहावर बँकेच्या फसवणुकीचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आहे. आता हाच धागा अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी स्टर्लिंग प्रकरणात अहमद पटेल आणि त्यांच्या जावयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सांदेसरा बांधव अहमदनगर पटेल यांचा जावई इरफान सिद्दीकी यांना मोठ्या प्रमाणात लाच देतात असा आरोप झाला होता