शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2017 (16:36 IST)

ईव्हीएमसोबत छेडछाड होऊ शकत नाही : निवडणूक आयोग

ईव्हीएमसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन  स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.  इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनमध्ये छेडछाड करून निवडणूक प्रक्रियेत गडबडगोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे.  'गेल्या 67 वर्षांपासून निवडणूक आयोगानं यशस्वीरित्या निवडणूक घेतल्या आहेत. मात्र नुकत्याच 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाला काही सूचनाही मिळाल्या आहे'', अशी माहिती देत मुख्य निवडणूक आयुक्त  डॉ. नसीम झैदी यांनी ईव्हीएम गोंधळाबाबतचे आरोप धुडकावून लावले आहेत.