रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (16:45 IST)

12व्या मजल्यावरच्या रेलिंगला लटकून व्यायाम, व्हिडीओ व्हायरल

व्यायाम करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. व्यायाम केल्याने शरीर फिट राहते. पण व्यायाम करण्याची देखील काही पद्धत आहे. व्यायाम योग्य पद्धतीने केल्यावर त्याचा फायदा मिळतो. दिल्लीत एका व्यक्तीचा व्यायाम करत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या धक्कादायक व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती 12 व्या मजलावरील बाल्कनीच्या रेलिंगला लटकून व्यायाम करत आहे. हा प्रकार दिल्लीच्या जवळ फरीदाबादच्या सेक्टर-82 मध्ये असलेल्या ग्रँडुरा सोसायटीच्या ई-ब्लॉकचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती 12व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या बाल्कनीची रेलिंग पकडून बाहेरून डोलताना कसरत करत आहे. हा व्हिडिओही सोसायटीसमोरील इमारतीतील एका व्यक्तीने कॅप्चर करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

व्हिडिओ संपण्यापूर्वी तो माणूस बाल्कनीतून आत येताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक हैराण आणि काळजीत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.