मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (13:06 IST)

जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर जवानांनी शिवजयंती साजरी केली

काल छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करण्यात आला. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर पूंछ मेंढर सेक्टरमध्ये तैनात असलेल्या मराठा युनिटच्या जवानांनी खूप जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा केला. या बाबतची माहिती औरंगाबादातील रहिवासी सुभेदार मेजर व्ही.जी.लोखंडे यांनी दिली. या प्रसंगी जवानांनी ढोल ताशा आणि लेझीमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. जवानांनी 'जय भवानी जय शिवाजी' 'छत्रपती शिवाजी महाराजांची जय' या घोषणेने परिसरातील वातावरण उत्साही झाले होते.